एरंडोल : प्रवीण पाटील
जिल्ह्यातील एरंडोल पोलिस ठाण्यात आज रात्री ८:१५ च्या सुमारास दोन हवलदारामध्ये फ्रिस्टाइल झाल्याची घटना घडली यातील एक पोलिस हवालदार वाहतूक शाखेतील तर दुसरा एरंडोल पोलिस स्टेशनमध्ये आहे. ही घटना पोलिस स्टेशनच्या सि.सि.टीव्ही मध्ये कैद झालेले आहे परंतु या घटनेची वाच्यता होऊ नये याची खबरदारी या ठिकाणी कर्तव्यावर हजर असणारे पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी घेतली आहे.
त्यामुळे यातील सत्यता तपासून कार्यवाही व्हावी अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.या बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करावी जेणेकरून जण सामान्यात पोलिसांची प्रतिमा मलीन होऊ नये. सदर पोलिस कर्मचाऱ्यांनी मद्यपान केल्याची माहिती मिळते.