जळगाव प्रतिनिधी । शहरातील दत्त कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री बंद घरातून सोने व चांदीच्या दागिन्यांसह एकुण १ लाख ९१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, सविता यतीन पाटील (वय-३०) रा. सुनंदीन पार्क, दत्त कॉलनी, जळगाव ह्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवारी २२ जानेवारी महिला व तिचे कुटुंबिय कामानिमित घर बंद करून बाहेरगावी गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घर असल्याचे पाहून घरच्या वरच्या मजल्यावर जावून दरवाजाची आतील कडी आरशात पाहून उघडली. घरातील लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, १५ हजाराची रोकड असा एकुण १ लाख ९१ हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार २४ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आला. सविता पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश सपकाळे करीत आहे.