मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी व महायुतीमध्ये जागा वाटपाचा प्रश्न सुटत नसताना नुकतेच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मोठे वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा महायुतीमध्ये वाद निर्माण होणार असल्याचे दिसत आहे.
आ.गायकवाड म्हणाले कि, येत्या विधानसभा निवडणुका या एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्त्वामध्ये लढल्या जातील. शिवसेना 120 जागा लढवणार आहे. आमचे टार्गेट हे 100 जागा जिंकण्याचे आहे, असे म्हटल्याने आता नेमके महायुतीत जागा वाटप कसे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, आमच्या महायुतीतील नेत्यांना, कार्यकर्त्यांना बुद्धी यावी, जेणे करून ते चुकीचे वक्तव्य करणार नाहीत, अशी प्रार्थना करेल. आपण सगळे एक आहोत, आणि एक होऊन विधानसभेला सामोरे जाणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. भाजप असो किंवा शिंदे गट किंवा अजितदादा गट… महायुतीत सर्वांना न्याय मिळेल. दिल्लीतील नेत्यांनी सुद्धा सर्वांना आश्वासन दिले आहे. कोणावर अन्याय होणार नाही, असे दिल्लीच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. आता जे बाकीचे कार्यकर्ते, आमदार आपापल्या पद्धतीने काहीही बोलत असतील तर यावर माझे काही म्हणणे नाही. नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये मतभेत निर्माण होत आहेत. महायुती बरोबरच बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांमुळे त्यांचे पक्षही अडचणीत येत असल्याची तिन्ही घटक पक्षाची भावना आहे. त्यामुळे तीनही पक्षांनी एकत्रित येऊन हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.