धरणगाव : प्रतिनिधी
येथील जळगाव रस्त्यावरील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथे शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी खेड्यापाड्यातून व बाहेरगावाहून येत असतात, सदरील महाविद्यालयासमोर बस थांबा असल्यावर सुद्धा तेथे कोणत्याही डेपोची बस थांबत नाही त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींचे खूप हाल होत होते, या अनुषंगाने भारती विद्यार्थी सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी धरणगाव बस डेपोचे मॅनेजर यांच्याकडे निवेदन दिले व तसेच धरणगाव पोलीस स्टेशनचे पि आय साहेब श्री पवन देसले साहेब यांच्या कडे सुद्धा बस थांबावी म्हणून निवेदन देण्यात आले.
त्याप्रसंगी युवा सेनेचे जितेश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश विसावे ,उपाध्यक्ष नयन वाघरे, सोनू पारधी, ओम मुरावकर, राज वाघरे, प्रेम पारधी, राज पटवणे, त्यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते,