मुंबई : वृत्तसंस्था
देशासह राज्यात उद्या होणाऱ्या गणेश चतुर्थीची जोरदार तयारी सुरु असतांना या दिवशी देशभरात गणपतीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. यासाठी दिवसभरात 3 शुभ मुहूर्त असतील. सूर्यास्तापूर्वी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे. गणेश पुराणानुसार, गणपतीचा जन्म चतुर्थी तिथी आणि चित्रा नक्षत्राचा मध्याह्न काळ म्हणजेच दिवसाच्या उत्तरार्धात झाला होता. हा शुभ काळ सकाळी 11.20 पासून सुरू होत आहे.
यावेळी गणेश चतुर्थीच्या दिवशी सुमुख नावाचा शुभ योग तयार होत आहे. हे देखील गणपतीचे एक नाव आहे. पारिजात, बुधादित्य आणि सर्वार्थसिद्धी योग तयार होत आहेत. या संयोगाने गणपती स्थापनेचे शुभ परिणाम आणखी वाढतील असे ज्योतिषी मानतात.
शास्त्रानुसार गणेशाची अनेक रूपे आहेत, परंतु भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेश चतुर्थीला सिद्धीविनायकाच्या रूपात गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे. भगवान विष्णूंनी गणेशाच्या या रूपाची पूजा केली आणि त्यांना हे नाव देखील दिले.
चौरंग किंवा पाटावर स्वस्तिक बनवा आणि चिमूटभर तांदूळ ठेवा.
त्यावर लाल धाग्यात गुंडाळलेली सुपारी ठेवा. या सुपारीच्या गणेशाची पूजा करा.
हेही शक्य नसेल तर नुसते मोदक आणि दुर्वा अर्पण करून भक्तिभावाने नमस्कार केल्यानेही देवाचा आशीर्वाद मिळतो.