Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘आय लव्ह यू पप्पा, त्याला सोडू नका’ सुसाईड नोट लिहून तरूणीची गळफास घेवून आत्महत्या
    क्राईम

    ‘आय लव्ह यू पप्पा, त्याला सोडू नका’ सुसाईड नोट लिहून तरूणीची गळफास घेवून आत्महत्या

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 25, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई वृत्तसंस्था । ‘आय लव्ह यू पप्पा त्याला सोडू नका’ असे सुसाईड नोटमध्ये लिहून २१ वर्षीय तरूणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील जोगेश्वरी पूर्वेला असलेल्या रामवाडी भागात उघडकीला आला आहे. मृत्यूआधी तिनं लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे अनेकांना धक्का दिला आहे.

    नाव जान्हवी विजय चव्हाण असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. आत्महत्या करण्यापुर्वी तरूणीने आपला मोबाईलचा पासवर्ड तिनं सुसाईड नोटमध्ये सांगितला असून तिच्या आत्महत्येची नोट वाचून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. ‘पप्पा यात सर्व पुरावे आहेत, त्याला सोडू नका’ असं जान्हवीने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. सोबत तिनं आपल्या मोबाईलचा पासवर्ड दिली आहे. दरम्यान, या घटनेनं जोगेश्वरीतील रामवाडी परिसर हादरुन गेला आहे. एका तरुणालाही या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

    2 वर्षांपूर्वी बायको गेली, आता मुलीची आत्महत्या…
    विजय चव्हाण हे जोगेश्वरीतल्या रामवाडीत राहातात. पालिकेच्या जल विभागात फिटर म्हणून काम करणारे विजय चव्हाण यांच्या पत्नीचं दोन वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर त्यांच्या मोठ्या मुलाचं लग्न लावून देण्यात आलं होतं. मोठा मुलगा लग्नानंतर विरारला राहत होता. दरम्यान, त्यांना एक मुलगीही होती. मोठ्या मुलीच्या लग्नानंतर मुलगी घरात बराचवेळ एकटीच असायची. दरम्यान, पत्नीच्या निधनानंतर आता मुलीनंही आत्महत्या केल्यानं चव्हाण कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

    मयत जान्हवीचे निखील नावाच्या मुलावर प्रेम होते. जान्हवी ही अंधेरीच्या कोविड लसीकरण केंद्रात अटेडंट म्हणून काम करत होती वडील कामानिमित्त सतत बाहेर असलेल्या जान्हवीचे निखिलसोबत प्रेमसंबंध जुळले होते. अनेकदा ती फोनवरुन त्याच्याशी संपर्कात असायची.

    आई नसल्यानं, वडील कामानिमित्त बराच काळ घराबाहेर असल्यानं आणि भाऊ लग्नानंतर विरारला राहायला गेल्यामुळे जान्हवी एकटी पडल्याचं तिच्या सुसाईड नोटमध्ये दिसून आलं आहे. सॉरी पप्पा मी तुम्हाला एकटे सोडून गेली. मला जायचं नव्हतं. पण आता सहन होतं नाही. मी त्याच्यावर खूप प्रेम केलं. त्याच्याशिवाय मला दुसरं माझं कुणी नव्हतं. पण तो माझ्या भावनांशी खेळला. आय लव्ह यू पप्पा, काळजी घ्या. पप्पा माझ्या मोबाईलमध्ये सगळे पुरावे आहेत. सोडू नका त्याला, असं लिहीलंय. सध्या पोलिस याप्रकरणी निखिलची चौकशी करत असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.