धरणगाव प्रतिनिधी । भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने उभ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना तालुक्यातील रोटवद येथे घडली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील रोटवद येथील गावाजवळ रस्त्या बंद पडलेल्या ट्रक्टरला भरधाव वेगाने जात असलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार मानसिंग देवसिंग पाटील हा दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी २४ जानेवारी रोजी सायंकाळी घडली. अपघात होताच काही तरूणांनी धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दुचाकीस्वाराला आणण्यात आले होते. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा धरणगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.