रावेर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुल्धार पाऊस सुरु असून नुकतेच दोधे शिवारात तापी नदीकाठी वास्तव्याला असणाऱ्या हातमुजरांच्या झोपडीवर दि. २ रोजी सायंकाळी ८:३० वाजता वीज कोसळली. त्यामुळे झोपडी जळून खाक झाली आहे. या घटनेत मध्यप्रदेशातील पाच जण जखमी झाले आहेत. यातील दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत रेखा कालू खरते, (वय २४, रा. बढी, ता. झिरण्या, मध्यप्रदेश), मीरा प्रताप जमरे (वय २८, रा. रतलीपुरा, ता. झिरण्या), पूजा प्रताप जमरे (वय ६) हे गंभीर जखमी झाले आहेत. कालू नाना खरते (२६, बढी, ता झिरण्या, जि. खरगोन) आणि ज्योती चंदरसिंग रावत (वय २९, रा. खिराला ता. झिरण्या, जि खरगोन) हे किरकोळ जखमी झाले आहेत.
कालू नाना खरते (२६, बढी, ता झिरण्या, जि. खरगोन) व ज्योती चंदरसिंग रावत (वय २९, रा. खिराला, ता. झिरण्या, जि खरगोन) हे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना सुरुवातीला रावेर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. रावेर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ शुभांगी चौधरी यांनी तातडीने औषधोपचार केले. यातील रेखा खरते आणि पुजा जमरे या गंभीर असल्याची माहिती देण्यात आली. जखमींच्या परिवाराने केलेल्या विनंतीनुसार त्यांना बऱ्हाणपूर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.