Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळके-वावडदा रस्त्यावर भीषण अपघात : दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू
    क्राईम

    जळके-वावडदा रस्त्यावर भीषण अपघात : दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू

    editor deskBy editor deskSeptember 2, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच एरंडोल-नेरी रस्त्यावर जळके येथून पवन गोपाल सूर्यवंशी वय १७ वर्षे व अलताफ बंन्डु तडवी वय १९ वर्षे हे मोटर सायकल क्रमांक MH 19BV7531ने वावडदा येथे पोळा सण असल्यामुळे बैलासाठी साज घेण्यासाठी गेला होता परतीचा प्रवास करत असताना लहु पाटील यांच्या शेताजवळ सकाळी ९:३०वाजता नेरीकडुन समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्रमांक HR 73-9316 याने उडवलं यात मोटारसायकलवर मागे बसलेला पवन गोपाल सूर्यवंशी या तरुणांच्या अंगावरुन ट्रक चे चाक गेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला.

    मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रक अर्शिद सत्तार खान ( चालक) वय वर्षे ५० हा व त्याचा किन्नर शब्बीर हजरत खान वय २०वर्षे घटनास्थळावरून घेऊन एरंडोलच्या दिशेने पसार झाला.या घटनेची माहिती औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला मिळाल्याने त्यांनी एरंडोल पोलिस स्टेशनशी संपर्क साधला व येथील कर्तव्यावर हजर असणारे पोलिस कर्मचारी कपिल पाटील, दत्ता ठाकरे व दिपक पाटील यांनी एरंडोल चौफुलीवर अपघात ग्रस्त ट्रक सह चालक व किन्नर यांना ताब्यात घेतले.

    यावेळी पोलीस कर्मचारी दिपक पाटील हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळते. एरंडोल या ठिकाणी जळगाव औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले,पो.हे.कॉ.स्वप्नील पाटील याचे पथक पोहोचले व ट्रकसह आरोपींना ताब्यात घेऊन जळगाव येथे रवाना झाले.तसेच घटनास्थळी म्हसावद पोलिस स्टेशनचे पो.हे.कॉ. प्रदीप पाटील यांनी मयत तरुणाचा मृतदेह शवच्छेदनासाठी जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालय येथे पाठविण्यात आला व अपघातग्रस्त मोटारसायकल ताब्यात घेऊन म्हसावद पोलिस ठाण्यात नेण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.