• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

editor desk by editor desk
September 1, 2024
in अमळनेर, क्राईम
0
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

अमळनेर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या मालिका सुरु असतांना अमळनेर तालुक्यात देखील अपघाताच्या घटनेत तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुचाकी लावून बाजूला उभा असलेल्या तरुणाला वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक देत पळ काढला. या अपघातात या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी 31 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 1.30 वाजता अमळनेर तालुक्यातील कुऱ्हे खुर्द गावाजवळ घडली. याप्रकरणी सकाळी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भटू दगा चव्हाण रा. कर्ले ता. सिंदखेडा जि. धुळे असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथे भटू चव्हाण हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. दरम्यान शनिवारी 31 ऑगस्ट रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सोमवार असतो दुचाकी (जीजे 05 सीसी 4714) ने जात असताना अमळनेर तालुक्यातील कुऱ्हे खुर्द गावाजवळ रस्त्यावर दुचाकी करून उभा असताना अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी कुऱ्हे खुर्द गावातील पोलीस पाटील राकेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन नावावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Previous Post

फडणवीसांनी आघाडीला पकडले कोंडीत ; काँग्रेसला माफी मागण्यास लावणार का?

Next Post

राजकारणात विरोधक पराभूत होणार !

Next Post
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !

राजकारणात विरोधक पराभूत होणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group