धरणगाव : प्रतिनिधी
येथील पी आर हायस्कूल सोसायटीचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आज भारतीय विद्यार्थी सेना शाखेच्या फलकाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तसेच प्रतापराव पाटील यांनी विद्यार्थी सेनेच्या सदस्यांची नाव नोंदणी करून घेतली आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते छत्र्या देखील वाटप करण्यात आल्या आहेत.
धरणगाव येथील पीआर हायस्कूल सोसायटीचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आज (दि. 31) रोजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते भारतीय विद्यार्थी सेना शाखेच्या पालकाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रतापराव पाटील यांनी स्वतः विद्यार्थी सेनेच्या सदस्याची नोंद केली आणि सदस्यांना शिवबंधन बांधले. तसेच महाविद्यालयातील प्रोग्राम हॉलमध्ये विद्यार्थी सेनेला त्यांनी छत्र्या, वह्या वाटप केल्या. प्रतापराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच लवकरच ओपन जिम देखील तयार करण्यात येईल असे वचन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी विद्यार्थी सेनेत कल्पेश विसावे – ( शहर प्रमुख ), नयन वाघरे – ( उप शहर प्रमुख ), सोनु पारधी – ( उप शहर प्रमुख ), हितेश पाटील – (मिडिया प्रमुख), निलेश चौधरी – (मिडिया प्रमुख), भावेश माळी – ( मिडिया प्रमुख ), राहुल अलट – ( संघटन प्रमुख ), ललित महाजन – उप संघटन प्रमुख ), तोसिफ पटेल – ( विभाग प्रमुख ), हिमेश महाजन – ( विभाग प्रमुख ), राज पटोने – ( उप विभाग प्रमुख ), निखिल महाजन – ( उप विभाग प्रमुख ), विक्की धनगर – ( संपर्क प्रमुख ), ओम मोरवरकर – ( संपर्क प्रमुख ), दिपक राजपुत – ( सह संपर्क प्रमुख ), साई कासार – ( सह संपर्क प्रमुख ), कृष्णा झुंजारराव (मीडिया प्रमुख), तुषार भाटिया (मीडिया प्रमुख) या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी धरणगाव नगरपालिकेचे गटनेते पप्पू भावे, शहर प्रमुख विलास महाजन, उपशहर प्रमुख बाळू जाधव, शेतकरी सेना तालुकाप्रमुख विनायक महाजन, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख विशाल महाजन, पवन महाजन, बुटा पाटील, दीपक भदाने वाल्मीक पाटील, निलेश महाजन, तेजस महाजन, प्रशांत सोळके, गिरीश चौधरी, सुमित मराठे यांच्यासह शिक्षक वृंद एस डी शिंगणे सर वळवी सरयावेळी धरणगाव नगरपालिकेचे गटनेते पप्पू भावे, शहर प्रमुख विलास महाजन, उपशहर प्रमुख बाळू जाधव, शेतकरी सेना तालुकाप्रमुख विनायक महाजन, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख विशाल महाजन, पवन महाजन, बुटा पाटील, दीपक भदाने वाल्मीक पाटील, निलेश महाजन, तेजस महाजन, प्रशांत सोडके गिरीश चौधरी, सुमित मराठी यांच्या सह शिक्षक वृंद एस बी शिंगाणे सर, वडवी सर, बी एल खोंडे सर, रत्ना चौधरी मॅडम, कविता महाजन आदि उपस्थित होते.