यावल : प्रतिनिधी
यावल-चोपडा रस्त्यावर वढोदाजवळ एका दुचाकीवर जात असलेल्या वृद्ध दाम्पत्याला मागून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात वृद्ध दाम्पत्य जखमी झाले. त्यांच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल शहरात बँकेतील ई केवायसी करण्यासाठी जनार्दन प्रल्हाद नारखेडे (६५) आशाबाई जनार्दन नारखेडे (६०) रा. डांभूर्णी हे दाम्पत्य आले होते. शुक्रवारी काम आटोपून सायंकाळी दुचाकीने क्रमांक एमएच १९ एबी १२९९ घरी जात असताना वढोदाजवळ मागून भरधाव येणाऱ्या दुचाकीने क्रमांक एमएच १९ एड़झेड ८८१० धडक दिली. या अपघातात जनार्दन नारखेडे आणि आशाबाई नारखेडे यांना जबर दुखापत झाली आहे. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकार डॉ. तुषार सोनवणे, डॉ. कोमल नरवाडे- पाटील, डॉ. अनुजा चालक, अधिपरिचारिका आरती कोल्हे, ज्योत्स्ना निंबाळकर, संजय जेधे यांनी उपचार केले. दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.