लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । शहरातील गोलाणी मार्केटमधील एका व्यापाऱ्याला रास्त भावात माल देण्याचे आमीष दाखवत १ लाख ६० हजार ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकॉलनी येथील रहिवासी सचिन रंगनाथ देशपांडे (वय-४३) यांचे गोलाणी व्यापारी संकुलात व्यवसाय आहे. सचिन देशपांडे यांना भोपाळ येथील व्हेरटेक्स होम केअर इंडस्ट्रीजच्या अभिलाश शर्मा या मालकाने स्वस्त दरात माल पुरवण्याचे आमीष दाखवुन देशपांडे यांना १ लाख ६० हजार रुपये ऑनलाईन खात्यात वर्ग करण्याचे सांगीतले. १२ मार्च २०२१ ते २४ मे २०२१ दरम्यान पैसे वर्ग करुनही माल दिला नाही. याबाबत देशपांडे यांनी संपर्क साधला असता उडवा उडवीची उत्तरे देत होता. अखेर देशपांडे यांनी रविवारी २३ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अभिलाश शर्मा याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहरपोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.श्