• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अजित पवारांचे ठरले : विधानसभा निवडणुकीत इतक्या जागा लढविणार !

editor desk by editor desk
August 31, 2024
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
अजित पवारांचे ठरले : विधानसभा निवडणुकीत इतक्या जागा लढविणार !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील विधानसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याआधीच महायुतीमध्ये जागावाटपावरून धुसफूस सुरू आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आगामी निवडणुकीत ६० पेक्षा जास्त जागा लढणार असल्याचे सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आणि युवकांचा मेळावा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीला कोणते मुद्दे घेऊन सामोरे जायचे याबाबत सखोल मार्गदर्शन युवक पदाधिका-यांना केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेला किती जागा लढणार याबाबतही त्यांनी खुलासा केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या ५४ आमदार आहेत. तर दोन आमदारांचा पाठिंबा आहे. शिवाय काँग्रेसचे ४ आमदार राष्ट्रवादीत येणार आहेत. त्यामुळे ६० जागा या आपल्याच आहेत. या जागांवर आपण लढणार हे निश्चित आहे, असे ते म्हणाले.

अजित पवार यांनी सध्यातरी ६० जागा लढण्याचे सांगितले असले तरी ९० ते ९५ जागा मिळाव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे. यामुळे ते तसा दावा करू शकतात. मात्र त्यापैकी किती जागा राष्ट्रवादीच्या पारड्यात पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. लोकसभेला अजित पवार गटाला कमी जागा देण्यात आल्या होत्या. यामुळे यावेळी अजित पवार गट जास्त जागा मागणार हे निश्चित आहे. दरम्यान, विधानसभेत भाजपने १२५ जागांचे टार्गेट ठेवले आहे. तर शिंदे शिवसेनाही १०० जागांवर डोळा ठेवून आहे. यामुळे जागावाटपात महायुतीमध्ये धुसफूस होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Previous Post

संतापजनक : रुग्णालयात एक्स-रे काढण्यासाठी गेलेल्या तरुणीला केले निर्वस्त्र

Next Post

रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी : आता 9 जीवनावश्यक गोष्टी देणार !

Next Post
रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी : आता 9 जीवनावश्यक गोष्टी देणार !

रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी : आता 9 जीवनावश्यक गोष्टी देणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !
क्राईम

पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !

July 1, 2025
दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !
क्राईम

दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !

July 1, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

वराची फिर्याद, जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group