जळगाव : प्रतिनिधी
रामानंदनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पिंप्राळा भागात जुन्या वादात तक्रार केल्याचा राग आल्याने एकाने ३० वर्षीय विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. नूर मोहम्मद शेख लतीफ (वय ४०, रा. अक्सानगर) याच्यावर दि. २९ रोजी, रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेच्या फिर्यादीनुसार, पीडित महिलेसोबत काही वाद झाले होते. त्याबाबत महिलेने नूर मोहम्मद विरुद्ध तक्रार देण्याची तयारी केली होती. ही माहिती मिळाल्यानंतर २० जुलै २०२४ रोजी नूर मोहम्मद हा रात्री ११.४५ वाजता महिलेच्या घरी आला, तेव्हा महिला घरी एकटीच असताना, माझ्या विरुद्ध तक्रार केली म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर महिलेवर अत्याचार केला. याबाबत जर कोणाला सांगितले तर, महिलेच्या पतीसह मुलांना ठार मारण्याची धमकी नूर मोहम्मद याने दिली, असे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.