यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील थोरगव्हाण येथील रहिवासी स्वप्निल देवीदास चौधरी (३०) याने घरात गळफास घेत आत्महत्या केली. शुक्रवारी ही घटना घडली. विशेष म्हणजे त्याने पत्नी पूनम हीस चिप्स तळून मागितले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी किचनमध्ये चिप्स करत असताना दुसऱ्या खोलीत त्याने आत्महत्या केली. पत्नी पूनमही चिप्स द्यायला गेली असता हा प्रकार लक्षात आला. घटनेमागील कारण समजू शकले नाही. स्वप्निल याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात विजय नवल चौधरी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार अर्जुन सोनवणे करीत आहे.