जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ३३८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर २२१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
जळगाव शहर-११९, जळगाव ग्रामीण-१६, भुसावळ-८७, अमळनेर-२०, चोपडा-२६, पाचोरा-२, भडगाव -५, धरणगाव-१३, यावल-६, एरंडोल-०, जामनेर-८, रावेर-३, पारोळा-०, चाळीसगाव-२५, मुक्ताईनगर-५, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ३ असे एकुण ३३८ रूग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४७ हजार ८८५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १ लाख ४२ हजार ५९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजवर एकुण २ हजार ५८२ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज जिल्ह्यातून २२१ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार २४४ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.