जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील जिल्हा कारागृह नेहमीच कुठल्याना कुठल्या कारणाने चर्चेत येत असतांना नुकतेच येथे बंदिवान कायद्यांच्या दोन गटात गटांमध्ये तुफान दगडफेक होऊन हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार ३० ऑगस्ट रोजी १० वाजेच्या सुमारास घडली आहे यात एक जण गंभीर जखमी तर इतर किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हा कारागृहामध्ये बंदी वाहनांसाठी कॅन्टीनच्या सामानावरून कारागृहातील जिल्हा बॅरिकेट क्रमांक १ ते ४ आणि ९ ते १२ येथे वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यात दाखल असलेले कैदी यांच्यात जुना वाद उफाळून आल्याने दोन गटात सुरुवातीला किरकोळ वाद झाला. त्यानंतर या वादाचे रूपांतर दोन गटात हाणामारी होऊन तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकमध्ये सचिन सोमनाथ गायकवाड (वय 30 रा. सबजेल जळगाव) हा बंदीवान कैदी हे जखमी झाले आहे तर इतर किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. हा वाद कोणत्या कारणासाठी झाला याची माहिती अद्यापसमोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्यासह किंवा जिल्हा कारागृहात दाखल झाले आहे.