मुंबई : वृत्तसंस्था
जनतेही जर बँकेत कामे असतील तर ती लवकर पूर्ण करून घ्या कारण काही दिवसातच सप्टेंबर महिना लागणार आहे.. या महिन्यात बँकांना भरपूर सुट्ट्या आहेत.. म्हणून सुट्ट्यांची यादी वाचूनच बँकेत जा , जेणेकरून तुमची फेरी वाया जाणार नाही.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकांमधील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. रविवार 1 सप्टेंबर 2024 रोजी साप्ताहिक सुट्टी असल्याने देशभरातील बँक शाखा बंद राहतील. याशिवाय या महिन्यात अनेक राज्यांमध्ये मोठे सण आहेत, त्यामुळे संबंधित राज्यांमध्ये बँक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने आपला गणेश चतुर्थीचा सण आहे.
RBI च्या हॉलिडे कॅलेंडर 2024 नुसार, भारतातील विविध क्षेत्रांमधील खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका सप्टेंबरमध्ये एकूण 15 दिवस बंद राहतील. सप्टेंबरमधील 15 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुट्ट्या तसेच रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार यांचा समावेश होतो.
संपूर्ण यादी पाहा…
1 सप्टेंबर- रविवारची सुट्टी
4 सप्टेंबर- श्रीमंत शंकरदेवाची तिरुभव तिथीची सुट्टी (गुवाहाटी)
7 सप्टेंबर- गणेश चतुर्थी (जवळपास भारतातील संपूर्ण बँकांना सुट्टी असणार)
8 सप्टेंबर- रविवारची सुट्टी
14 सप्टेंबर- दुसरा शनिवारची सुट्टी, पहिला ओणम (कोची, रांची आणि तिरुवनंतपुरम)
1 सप्टेंबर- रविवारची सूट्टी
16 सप्टेंबर- बारावाफट (जवळजवळ संपूर्ण भारतातील बँकांना सुट्टी असणार)
17 सप्टेंबर- मिलाद-उन-नबीची सुट्टी (गंगटोक आणि रायपूर)
18 सप्टेंबर- पंग-लाहबसोलची सुट्टी (गंगटोक)
20 सप्टेंबर- ईद-ए-मिलाद-उल-नबीची सुट्टी (जम्मू आणि श्रीनगर)
22 सप्टेंबर- रविवारची सुट्टी
21 सप्टेंबर- श्री नारायण गुरु समाधी दिवसची सुट्टी (कोची आणि तिरुवनंतपुरम)
23 सप्टेंबर- महाराजा हरिसिंह यांचा जन्मदिनची सुट्टी (जम्मू आणि श्रीनगर)
28 सप्टेंबर- चौथा शनिवारची सुट्टी
29 सप्टेंबर- रविवारची सुट्टी