Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरदिवसा आठ जिवंत काडतूस, एक बनावटीचे पिस्तूलसह एक अटकेत !
    क्राईम

    भरदिवसा आठ जिवंत काडतूस, एक बनावटीचे पिस्तूलसह एक अटकेत !

    editor deskBy editor deskAugust 29, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    वरणगाव  शहरात पेट्रोलिंग करत असताना गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या संशयीताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता अटक केली असून त्याच्याकडून २५ हजार रुपये किंमतीचा गावठी बनावटीचे पिस्तूल आणि ८ जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. राज उर्फ मनोज सुरेश शिंदे वय-३९, रा. रामपेठ वरणगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव शहरात पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख हे मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता पेट्रोलिंग करत असताना त्याला संशयित आरोपी हा गावठी पिस्तूल बाळगत असल्याची गोपनिय माहिती मिळाली व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भवन आव्हाड यांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रीतम पाटील, पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख यांनी कारवाई करत संशयित आरोपी राज उर्फ मनोज सुरेश शिंदे याला अटक केली. त्याच्याकडून २५ हजार रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा पिस्तूल आणि ८ जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.