Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावातील शिक्षकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू
    क्राईम

    धरणगावातील शिक्षकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

    editor deskBy editor deskAugust 29, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    येथील बालकवी ठोंबरे विद्यालयाचे शिक्षकाला दिलेल्या धडकेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २७ रोजी सायंकाळी घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, येथील बालकवी ठोंबरे विद्यालयाचे शिक्षक व चिंतामण मोरया नगरमधील प्रमोद नारायण पाटील (वय ३२, रा. आर्थे खुर्द, ता.शिरपूर) हे २७ ऑगस्टला धरणगाव येथून संध्याकाळी पत्नी, मुलगा, मुलीला घेऊन माहेरी गेलेले होते. त्यांना सोडुन परत येत असताना रात्री धरणगाव ते सोनवद रस्त्यावरील तरडे गावाजवळ अज्ञात वाहनाने त्यांना धडक देऊन त्याने पोबारा केला. दरम्यान, जनार्दन पाटील यांच्या शेतात दुचाकी एमएच- १९, सीडी- ९२८३) व प्रमोद पाटील हे मृत अवस्थेत आढळून आले. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात सोनवद येथील पोलीस पाटील ज्ञानेश्वर पाटील यांनी सकाळी ८ वाजता दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहनचालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत प्रमोद न्पाटील हे बालकवी ठोंबरे विद्यालयात शिक्षक होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. धरणगाव ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. या वेळी कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “भोंदू अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; नरबळीचा संशय, न्यायालयात खळबळ”

    March 24, 2026

    ग्रंथदिंडीपासून ग्रंथोत्सवापर्यंत… जळगावात वाचनसंस्कृतीचा जल्लोष

    March 24, 2026

    धरणगाव महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ !

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.