Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » हद्दपार असतांना केला हॉटेलमध्ये गोळीबार
    क्राईम

    हद्दपार असतांना केला हॉटेलमध्ये गोळीबार

    editor deskBy editor deskAugust 29, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील भास्कर मार्केटसमोरील एका हॉटेलमध्ये दारु पित असलेल्या भूषण रघुनाथ सपकाळे (रा. खेडी. बु. ता. जळगाव) याने गोळीबार केल्याची घटना मंगळवारी घडली होती. याप्रकरणी त्याच्यासह आठ जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. गोळीबार करणारा भूषण सपकाळे याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले असून हद्दपार असतांना देखील त्याने जळगावात येऊन गोळीबार केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भास्कर मार्केटसमोरील हॉटेल शालीमार येथे रविवारी सायंकाळी हद्दपारीची कारवाई झालेला भूषण सपकाळे व मयुर सोनार यांच्यासह सात ते आठ जण दारु पिण्यासाठी आले. दारु पित असतांना अचानक त्या टोळक्यातील एकाने त्याच्याजवळील पिस्तुल काढून जमिनीवर गोळीबार केला. यावेळी भूषण सपकाळे याने जोरजोरात ओरडून मला भूषण सपकाळे म्हणतात, मी राऊंड फायर केला असे कुणाला सांगितले तर मर्डर करुन टाकेल अशी धमकी दिली. त्यानंतर त्याच्यासोबत असलेल्यांनी हॉटेलचे बील भरुन पळ काढला होता. गोळीबाराची घटना उघडकीस आल्यानंतर एलसीबीच्या पथकाने तपासचक्रे फिरवित संशयीत भूषण सपकाळे याला रात्री अटक केली. मात्र त्याच्याजवळ असलेले पिस्तुल मात्र मिळून आले नाही. त्याच्यासोबत असलेल्या साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.