Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भीषण अपघात : महामार्गावर ट्रकच्या धडकेत महिलेसह तरुणी जागीच ठार !
    क्राईम

    भीषण अपघात : महामार्गावर ट्रकच्या धडकेत महिलेसह तरुणी जागीच ठार !

    editor deskBy editor deskAugust 29, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    नातेवाइकांना मुलगा झाल्याने त्यास रुग्णालयात पाहण्यासाठी जाताना दुचाकीला ट्रकने मागून धडक दिली. यात १७ वर्षीय तरुणीसह महिलेचा जागीच मृत्यू झाला तर २ वर्षांचा चिमुरडा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी गुजराल पेट्रोलपंप ते मानराज चौक दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, दिक्षिता राहुल पाटील (वय २७, रा. नाशिक), पायल (खुशी) देवेंद्र जलंकर (१७ रा. वाटिकाश्रम, जळगाव) असे मयत महिला व तरुणीचे नाव आहे तर रुद्र राहुल पाटील (वय २) हा गंभीर जखमी झाला आहे. दिक्षिता यांचे वडील अर्जुन पाटील हे शहरातील वाटिकाश्रम येथील व्दारकाई अपार्टमेंट येथे वास्तव्यास आहेत. तर पायलदेखील आपल्या आई-वडिलांसह त्याच अपार्टमेंटला राहत होती. त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या नातेवाइकाला मुलगा झाला म्हणून, त्या मुलाला पाहण्यासाठी या दोघी सोबत जात होत्या. त्यावेळी खोटेनगर स्टॉपजवळील पुलावर खड्डा चुकविताना त्यांची दुचाकी ट्रॅक्टर व ट्रकच्या मधोमध अडकली. त्यातच दुचाकीला ट्रकची धडक बसल्याने त्या पडून ट्रकखाली चिरडल्या गेल्या. त्यातच दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर २ वर्षांचा रुद्र गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.