जळगाव : प्रतिनिधी
राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अश्यात राज्यातील एका जिल्ह्यात तर विविध ठिकाणी अक्षरशः जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच हवामान विभागातर्फे रेड अलर्ट देण्यात आल्यामुळे जिल्हाभरात अतिवृष्टीचा देखील इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
धुळे जिल्ह्यात पर्जन्यमानात वाढ झाल्याने हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. साक्री तालुक्यात जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पांझरा नदीला पुर येऊन बहुतांश गावातील संपर्क तुटलेला आहे. तसेच धुळे शहारातील लहान तीनही पुलांवर पाणी आल्याने रहदारीबाबत मोठी अडचण निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील एक- दोन दिवसात देखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाकडून जिल्ह्याला रेड अलर्ट जरी करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांची स्थानिक परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता लक्षात घेऊन २७ ऑगस्टला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच पावसाचे वातावरण पाहता पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.