जळगाव : प्रतिनिधी
काहीही कारण नसताना पप्पू जहांगीर शेख (२५, पिंप्राळा हुडको) यांना तीन जणांनी शिवीगाळ करीत चॉपरने वार केला, यात शेख जखमी झाले. ही घटना २४ ऑगस्ट रोजी आझादनगरात घडली. याप्रकरणी रविवारी (दि. २५) रामानंदनगर पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२४ ऑगस्ट रोजी आझादनगर परिसरात पप्पू शेख यांना पिंप्राळा हुडकोमधीलच तीन जणांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. एकाने चॉपरने वार करून जखमी केले. याप्रकरणी शेख यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेश चव्हाण करीत आहेत.