बोदवड : प्रतिनिधी
एकाच दिवसात दोन आत्महत्येच्या घटना तालुक्यात घडल्या. पहिल्या घटनेत मनूर खुर्द येथील विवाहित महिलेने विष प्राशन करून तर दुसऱ्या घटनेत चिखली बुद्रुक येथील तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. वर बुडून ट त त तालुक्यातील मनूर खुर्द येथील विवाहिता कल्पना योगेश हडपे हिने २५ रोजी राहत्या घरात विषारी द्रव्य प्राशन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतातून पती घरी आल्यानंतर तिच्या तोंडाला फेस आलेला त्याने पाहिला व लगेचच भुसावळ येथे उपचारासाठी हलविले. २६ रोजी या महिलेचा मृत्यू झाला. पश्चात पती योगेश तसेच सोहम व दुर्गेश अशी दोन लहान मुले आहेत. दुसऱ्या घटनेत चिखली बुद्रुक येथील योगेश मधुकर पाटील (३५) या तरुणाने शेती व खासगी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. २५ रोजी रात्री कामानिमित्त बाहेर जात असल्याचे सांगून तो उशिरापर्यंत घरी आला नाही. २६ रोजी सकाळी हरणखेड शिवारात असलेल्या विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. पश्चात दोन मुले, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दोन्ही घटनांबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.