Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जुन्या वादातून तरुणाला मारहाण
    क्राईम

    जुन्या वादातून तरुणाला मारहाण

    editor deskBy editor deskAugust 26, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जून्या भांडणाच्या कारणावरुन दुचाकीने जात असलेल्या फैजान राजू पटेल (वय २४, रा. राजमालती नगर) या तरुणला दारुच्या नशेत असलेल्या दोघांनी बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या हातातील मोबाईल जमीनीवर आपटून नुकसान केले, आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. ही घटना दि. २४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास सुरत रेल्वे गेटजवळ घडली. याप्रकरणी शहर पोलिसात अदलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, रामालती नगरात फैजान राजू पटेल (वय २४) हा तरुण वास्तव्यास आहे. त्याच परिसरातील सिद्धार्थ माणिक वानखेडे व त्याच्यासोबत असलेल्या एका जणासोबत यापुर्वी त्यांच्यात वाद होवून एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. याच भांडणाच्या कारणावरुन दि. २४ रोजी रात्रीच्या सुमारास फैजान पटेल हा दुचाकीने जात असतांना थांबला होता. दरम्यान, दारुच्या नशेत असलेल्या दोघांनी फैजानच्या हातातील मोबाईल जमिनीवर आपटून नुकसान केले. तसेच त्याला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. तसेच सिद्धार्थ याने फैजानच्या कानशिलात लगावून त्याला मारहाण केली. दरम्यान, फैजान पटेल हा तात्काळ शहर पोलीस ठाण्यात येवून त्याने तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरुन दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सफौ वाहेद तडवी हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.