नाशिक वृत्तसंस्था । नाशिक जिल्ह्यातील एका महिला तलाठीला शरीर सुखाची मागणी करण्याचा संतापजनक प्रकार प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात प्रांताधिकाऱ्याविरोधात तक्रार देवून त्याची बदली करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवला येथील वर्ग एक पदावर प्रांतअधिकारी म्हणून सोपान कासार यांची नियुक्ती करण्यात आली होती. या कासार याने गेल्या वर्षी काही कामानिमित्त एका महिला तलाठ्याला घरी बोलावले. त्यानंतर त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यामुळे संतापलेल्या तलाठ्याने या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. याप्रकरणाची प्रकरण चौकशीसाठी विशाखा समितीकडे सोपवण्यात आले आहे.
विशाखा समितीने तक्रारदार महिला तलाठी आणि प्रांतअधिकारी कासार या दोघांचेही जबाब नोंदवले. इतर साक्षीदारांचे जबाब घेतले. शिवाय दोघांना समोरासमोर बसवून उलट तपासणीही केली. त्यानंतर त्यांना या तक्रारीत तथ्य आढळल्याचे समोर आले. अखेर त्यांनी प्रांतअधिकारी कासावर कारवाई करावी, असा अहवाल जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवला. जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईची शिफारस आयुक्तांकडे केली. त्यानंतर आयुक्तांनी याप्रकरणी तातडीने दखल घेत कासा याची वर्धा येथील भूसंपादन उपजिल्हाधिकारी पदावर बदली केली.