Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुमजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली !
    क्राईम

    दुमजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली !

    editor deskBy editor deskAugust 26, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    शहरातील जुन्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर असताना यावल रोडलगत असलेल्या साई चंद्रनगर येथील तीन दुमजली रो हाऊस पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले. ही घटना रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने ही घरे कोसळण्याआधी तडे पडल्याचे लक्षात आल्याने घरातील व्यक्ती घराबाहेर मैदानावर आल्याने कोणासही इजा झाली नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. अशात शहरातील यावल रोडलगत असलेल्या साई चंद्रनगर येथील दुमजली इमारत कोसळण्याआधी या इमारतीला तडे पडले. याचा अंदाज आल्याने घरातील नागरिक घराच्या बाहेर पडले व अवघ्या १५ मिनिटांच्या फरकाने ही इमारत पडली. इमारत कोसळल्याच्या व्हिडीओ येथील नागरिकांनी चित्रित केला व लगेचच व्हायरल झाला.

    या घटनेमुळे या वसाहतीतील कंपाउंड वॉललासुद्धा मोठे तडे गेलेले आहेत. संभाव्य धोका बघता येथील धोकाग्रस्त इमारतीमधील नागरिकांना येथून घर खाली करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. भराव वाहून गेल्याने फटका सतारे शिवार, ता. भुसावळ येथे या तिन्ही इमारतींचा सततच्या पावसामुळे जमिनीचा भराव वाहून गेल्याने या नवीन घरांची पडझड झाल्याचा निष्कर्ष काढला गेला आहे. प्रति घराचे अंदाजे १५ ते २० लाखांचे तसेच घरातील मौल्यवान वस्तूंचे सुमारे ५ ते ६ लाखांचे प्रत्येकी नुकसान झाले आहे. तीनही कुटुंबांचे झालेले नुकसान खालीलप्रमाणे आहे. बाजुच्या रहिवाशांनाही इतर ठिकाणी जाण्याची सूचना पडझड झालेल्या घराच्या दक्षिण बाजूस असलेल्या सात रहिवाशांना इतर ठिकाणी राहण्याची सूचना प्रशासनाने केली आहे. तसेच पूर्व बाजूस असलेल्या पदमालय अपार्टमेंटमध्ये २४ फ्लॅट्सपैकी १७ फ्लॅट्समध्ये रहिवासी आहेत. इतर ५ रिकामे आहेत. या अपार्टमेंटच्या उत्तर बाजूस असलेल्या भिंतीस तडे पडून इमारत पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    येथील रहिवाशांना पालिकेकडून लोणारी मंगल कार्यालयात राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे. पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे, उपमुख्याधिकारी लोकेश ढाके, आपत्ती व्यवस्थान व बचाव पथक अग्निशमन दलाचे कर्मचारी, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी प्रफुल्ल कांबळे, तलाठी नितीन केले तसेच पवन नवगाळे व मंगेश पारीसे, कोतवाल जितेश चौधरी यांची उपस्थिती होती

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.