जळगाव : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तशी पारोळ्यात गद्दाराच्या मुलाच्या अंगात यायला सुरुवात झाली असून नुकतेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची सभा आणि त्यातच एका गाव गुंडाला हाताशी धरून गद्दारच्या मुलाने दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु पारोळा पोलीस निरीक्षक व पोलिसांना सलाम करावा लागेल पद्धतशीरपणे परिस्थिती हाताळली आणि गद्दाराच्या मुलाचे डाव उधळून लावला. राजकारणाची परिसीमा गाठायला सुरुवात झाली असून आता खोके मजबूत झाल्यामुळे झोप लागत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे डोक्यात सुपीक कल्पना येतात आणि त्यातूनच विनाशाची वाटचाल सुरू होते.
पारोळा म्हटलं म्हणजे गद्दार आणि खोके हे समीकरण मोठे जुळले असून पारोळा शहरात पोलिसांनी परिस्थिती हाताळल्यामुळे पारोळाकरांनी पोलिसांचे कौतुक करीत धन्यवाद देखील मानले आहे. सतत विवेक बुद्धी जागृत ठेवून पोलिसांनी आपलं शहर पारोळा शहर सुरक्षित रहावे म्हणून गद्दारांचा कुटिल डाव उधळून लावला अशी खाजगीत चर्चा जोर धरीत आहे. विशेष म्हणजे पोलीस दलाच्या प्रमुखांना मेसेज आला आणि तिथून खरी राजनीति लक्षात आली. गद्दाराच्या मुलाकडून एका लोकप्रतिनिधीच्या घरावर हल्ला करण्याचा डाव होता अशीही चर्चा पारोळा शहरात आहे. जमावला चिथावणी देऊन हल्ला करण्याचा प्रयत्न या गद्दाराच्या मुलाचा होता परंतु पोलिसांनी हा डाव देखील उधळून लावला. आता सत्तेची ताकद लावून पारोळा पोलीस निरीक्षकांची उचल बांगडी केली जाईल यासाठी या गद्दाराच्या मुलाकडून फिल्डिंग लावली जात आहे.