जळगाव ( प्रतिनिधी) – खोटे नगर परिसरातून एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या बंद घरातून अज्ञात चोरटयांनी ३६ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमंग सिमंग भगवानसिंग पाटील (वय ६१) हे पत्नी , मुलगा व सुन या परिवारासह वास्तव्यास आहेत. १५ जानेवारी रोजी कुटुंबासह उमंग पाटील हे खाजगी कामानिमित्ताने पुण्याला गेले होते. २० जानेवारी रोजी ते पुण्यावरुन घरी परतले. याप्रसंगी चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला . चोरट्यांनी उमंग पाटील यांच्या घरातून १० हजारांचा एलईडी टीव्ही, २० हजार रुपये रोख, फोन, ब्लुटूथ स्पीकर, ट्रॅव्हलिंग बॅग असे ६ हजारांचे साहित्य असा एकूण ३६ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याचे समोर आले. याप्रकरणी उमंग पाटील यांनी रविवारी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.