Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव एसीबीची कारवाई : १ लाख ८० हजाराची लाच घेताच लिपिक अटकेत !
    क्राईम

    जळगाव एसीबीची कारवाई : १ लाख ८० हजाराची लाच घेताच लिपिक अटकेत !

    editor deskBy editor deskAugust 22, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव  : प्रतिनिधी

    बदली झालेल्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी १ लाख ८० हजारांची लाच स्विकारणाऱ्या जिल्हा परिषदमधील सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपीक नरेंद्र किशोर खाचणे (वय ५२) याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवार २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता केली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे लोकसेवक असून ते यावल येथील सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई पदावर कार्यरत आहे. त्यांची स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक पदावर रावेर पंचायत समिती येथे बदली झाली होती. बदली ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी यातील नरेंद्र खाचणे यांनी २ लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार सापळा रचून बुधवार २१ रोजी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. तडजोडी अंती तक्रादाराकडून १ लाख ८० हजार रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.