Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ९ लाखाची फसवणूक करणाऱ्याला अटक
    क्राईम

    ९ लाखाची फसवणूक करणाऱ्याला अटक

    editor deskBy editor deskAugust 22, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सावदा : प्रतिनिधी

    शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करण्याचे अमिष दाखवीत ९ लाख ३५ हजारात फसवणुक केल्याप्रकरणी मध्यप्रदेशातील भोपाल येथे गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणातील संशयीत अनिकेत दत्तात्रय बऱ्हाटे (रा.भुसावळ) याच्या सावदा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. शेअरमार्केटच्या अॅपमध्ये पैसे गुंतवण्याचे आमीष दाखवुन बनावट शेअरमार्केटचे अॅप्लीकेशन बनवुन इसमाने ९ लाख ३५ हजारांची गुंतवणूक केली होती.

    कालांतराने त्या अॅप्लीकेशन मध्ये तक्रारदार यांची जमा झालेली रक्कम काढण्यासाठी गेले असता त्यांची फसवणुक झालेचे लक्षात आले. त्यानंतर भोपाल क्राईम ब्रेन्च येथे फसवणुक झाल्याची तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. भोपाल क्राईम ब्रांचमधील कर्मचाऱ्यांनी तांत्रीक माहीतीच्या आधारावर बनावट अकाऊंट तयार करणारा संशयित अनिकेत बऱ्हाटे याचा शोध घेतला. त्याचा सहभाग असल्याचे लक्षात येताच, तो सावदा येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली.

    पथक सावदा येथे आल्यानंतर त्यांनी सावदा पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल पाटील यांनी यांची भेट घेतली. त्यानंतर पोहेकॉ. उमेश पाटील, यशवंत टहाकळे, राजेद्र वैदकर व भोपाळ क्राइम ब्रँच येथील पथकाने अनिकेत बहऱ्हाटे याला त्याच्या नातेवाईकांच्या घरातून ताब्यात घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.