Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कंटेनरच्या जबर धडकेत दुचाकीवरील पत्नी ठार तर पती गंभीर
    क्राईम

    कंटेनरच्या जबर धडकेत दुचाकीवरील पत्नी ठार तर पती गंभीर

    editor deskBy editor deskAugust 22, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव : प्रतिनिधी

    अंत्ययात्रेसाठी पत्नीसह निघालेल्या दुचाकीस्वाराला मागून कंटेनरने धडक दिल्याने पत्नी जागीच ठार झाली तर पती जखमी झाला आहे. हा अपघात बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास धुळ्यानजीक घडला, गोटू वामन पाटील व त्यांची पत्नी संगीता गोटू पाटील (५०, जुवार्डी, ता. भडगाव) हे दोघे वनपाट ता. मालेगाव येथून बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास आपल्या नातेवाईकाच्या अंत्ययात्रेसाठी शिरसोलीकडे जात होते.

    महामार्ग क्र. ३ने मालेगावकडून शिरसोलीकडे जात असताना हॉटेल नालंदाजवळ महामार्गावर मोठा ट्रक उभा होता म्हणून ते बाजूने जात असताना मागून भरधाव येणाऱ्या कंटेनरने (एमएच ४/जीआर९५३४) मागून जोरदार धडक दिल्याने ते दोघेजण रस्त्यावर फेकले गेले. क्षणात संगीता पाटील यांच्या अंगावरून पुढचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

    गोटू पाटील बाजूला फेकले गेल्याने ते किरकोळ जखमी झाले. नातेवाइकांच्या अंत्यविधीला जात असताना संगीता पाटील यांचा अपघातात मृत्यू झाल्याने जुवार्डी गावावर शोककळा पसरली आहे. रुग्णवाहिकेने धुळे येथील हिरे मेडिकल येथे दोघांनाही तात्काळ हलवले. पण संगीता यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. ट्रकचालकाविरोधात पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगीता यांच्यावर जुवार्डीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना दोन मुले, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.