Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यात जोरदार पाऊस : वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू
    क्राईम

    जिल्ह्यात जोरदार पाऊस : वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू

    editor deskBy editor deskAugust 21, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव :  प्रतिनिधी

    जळगाव शहरासह चोपडा, अमळनेर, चाळीसगाव, भडगाव येथे मंगळवारी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. गुरे चारताना वीज कोसळून शिरसोलीतील शेतकऱ्याचा मृत्यू झाला. धुळ्यातही सोमवारनंतर मंगळवारी सलग दुस-या दिवशी पावसाने हजेरी लावली. नंदुरबार येथे मंगळवारी जोरदार पाऊस झाला.

    धरणाजवळ गुरे चारत असताना वीज कोसळल्याने त्र्यंबक ओंकार अस्वार (बारी) (७१, रा. शिरसोली प्र.न.) हे जागीच ठार झाले. या सोबतच तेथे एक म्हैसही दगावली. ही घटना तालुक्यातील शिरसोली शिवारातील नायगाव धरणाजवळ मंगळवारी दुपारी अडीच ते पावणे तीन वाजेदरम्यान घडली. त्र्यंबक अस्वार हे मंगळवारी नायगाव धरणाजवळ गुरे चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला व अस्वार यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या सोबतच त्यांच्या शेजारीच असलेली एक म्हैस ही दगावली.

    जळगाव जिल्ह्याला मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसाचा कापूस पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात चोपडा, अमळनेर, चाळीसगाव, भडगाव परिसरात दुपारी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. शेंदुर्णी येथेही काही भागात तुरळक पाऊस झाला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.