• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धक्कादायक : धरणगावात बनावट दारूच्या कारखान्यावर छापा; ४ अटकेत

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 23, 2022
in क्राईम, धरणगाव
0
धक्कादायक : धरणगावात बनावट दारूच्या कारखान्यावर छापा; ४ अटकेत

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील गजानन पार्क येथे बनावट देशी दारू कारखान्यावर राज्य उत्पादन शुक्ल विभागाने धडक कारवाई करत चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ११ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसाार, धरणगाव शहरातील गजानन पार्क परिसरात बनावट दारू तयार करून विक्री होत असल्याची गोपनिय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला शनिवारी २२ जानेवारी रोजी दुपारी मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादक शुल्क विभागाचे जिल्हा अधिक्षक सीमा झावरे यांच्यासह निरीक्षक सी. एच. पाटील, दुय्यम निरीक्षक ए. एस. पाटील, एस. एफ. ठेंगडे, जवान एन. व्हि. पाटील, ए. व्ही. गावंडे, एम. डी. पाटील, के. पी. सोनवणे, राहुल सोनवणे यांनी भास्कर पांडुरंग मराठे याचे साई गजानन पार्क येथील राहत्या घरावर छापा टाकला. याठिकाणी सुमारे ११ लाख रूपये किंमतीचा दारूचा साठा जप्त करण्यात आला.

या कारवाईत संशयित आरोप गौतप नरेंद्र माळी (वय-३२) रा. थवा, ता. नेत्रंग, जि. भरुच, (गुजरात) ह.मु. साईगजानन पार्क, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव,भुपेंद्र गोकुळ पाटील, वय २९ वर्षे, रा. मराठे गल्ली, धरणगाव, कडु राजाराम मराठे, वय ४० वर्षे, रा. मराठे गल्ली, धरणगाव आणि भास्कर पांडुरंग मराठे, वय ६३ वर्षे, रा. साई गजानन पार्क, धरणगाव या चौघांना अटक केली आहे.

लाखोंचा मुद्देमाल जप्त

बनावट देशीमदय तयार करण्याकरीता लागणारे साहीत्य स्पीरीट, बनावट देशी दारु टँगो पंचच्या १८० मिली च्या सिलबंद बाटल्याचे ११७ बॉक्स (५६१६ बाटल्या), बनावट देशी दारु टँगो पंचच्या ९० मिली च्या सिलबंद बाटल्यांचे ८६ बॉक्स (८६०० बाटल्या), देशीमदयाचा तयार ब्लेंड, ४ सिलींग मशिन, १ ब्लेंडिंग मशिन, बुचे, रिकाम्या बाटल्या, खोके, कागदी लेबल तसेच दोन दुचाकी असा एकुण ११ लाख २ हजार ४०० रूपये किंमतीचा दारूचा साठा व मुद्देमाल जप्त केला आहे.

Previous Post

विवाहितेचा विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Next Post

खंडेराव नगरात दोन गटात हाणामारी

Next Post
खंडेराव नगरात दोन गटात हाणामारी

खंडेराव नगरात दोन गटात हाणामारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group