जळगाव : प्रतिनिधी
मुलांसाठी नाश्ता घेण्यासाठी जाणारे रिक्षाचालक बबलू शेख उस्मान शेख (३५, रा. तांबापुरा) यांच्याकडे पैशाची मागणी केल्याने त्यांनी नकार देताच त्यांना दोन जणांनी मारहाण केली. ही घटना शनिवारी (१७ ऑगस्ट) रात्री इच्छादेवी चौकात घडली. १८ रोजी, एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, बबलू शेख उस्मान शेख हे शनिवारी रात्री मुलांसाठी नाश्ता घेण्यासाठी ईच्छादेवी चौकात आले होते. तेथे दोन जणांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. शेख यांनी पैसे नसल्याचे सांगितले. त्यावरून दोघांनी शेख यांना मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहेत.