Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लेकवर तलवारीने झालेला हल्ला आईने लावला परतावून
    क्राईम

    लेकवर तलवारीने झालेला हल्ला आईने लावला परतावून

    editor deskBy editor deskAugust 19, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कोल्हापूर : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच कोल्हापुर शहरात लेकावर तलवारीने झालेला हल्ला आईने केवळ दगडाच्या मदतीने परतावून लावल्याची थरारक घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला असून, ते पाहून या धाडसी माय- माऊलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरमध्ये रविवारी दुपारी गजबजलेल्या बाजारात ही घटना घडली. यासंबंधीच्या व्हिडिओत आई व तिचा मुलगा सुनील रामाप्पा लमाणी नामक मुलगा एकमेकांशी बोलताना दिसून येत आहेत. मुलगा दुचाकीवर बसलेला आहे. तर आई त्याच्या शेजारी उभी होती. काही वेळाने दुचाकीवरून 3 हल्लेखोर येतात. ते आपली दुचाकी या दोघांपासून काही अंतरावर लावलात. त्यानंतर तिघांपैकी एकजण अचानक तलवार काढून आईशी बोलणाऱ्या मुलावर हल्ला करतो. त्यात एक वार त्याच्या पाठीवर बसतो. मुलावर तलवारीने हल्ला झालेला पाहताच आई जवळ पडलेला दगड उचलून हल्लेखोराच्या अंगावर धावून जाते. तिचे हे रौद्ररुप पाहून हल्लेखोर दुसरा वार करण्याच्या अगोदरच तेथून काढता पाय घेतो.आईचे धाडस पाहून तिचा मुलगाही हातात दगड घेऊन हल्लेखोराच्या अंगावर धावून जाताना दिसून येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचा अंदाज आहे.

    उल्लेखनीय बाब म्हणजे ही घटना घडली तो जयसिंगपूरचा अत्यंत गजबजलेला भाग आहे. त्यानंतरही तिथे थेट तलवारीने हल्ला झाल्यामुळे स्थानिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही या प्रकरणी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेत सुनील हा जखमी झाला आहे. या प्रकरणी विनोद कासू पवार, अरविंद कासू पवार व विनोद बाबू जाधव या तिघांविरोधात जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियात चांगलेच व्हायरल झाले आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.