जळगाव : प्रतिनिधी
येत्या काही दिवसात राज्यासह जिल्ह्यात गणेशोत्सवाचा माध्यमातून सणांना सुरुवात होत आहे. गणेशोत्सवाचा आला म्हणजे ढोलताशे देखील आलेच. शहरात देखील ढोल ताशा व लेझीमला महत्व मिळावे व तरुण-तरुणीमध्ये सांस्कृतिक कलेला वाव मिळावा. यासाठी शहराचे आ.राजूमामा भोळे यांच्या माध्यमातून जळगावात भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील सागर पार्क येथे येत्या १८ ऑगस्ट २०२४ रोजी पासून आ.राजू मामा भोळे आयोजित या महोत्सवास ढोल ताशा व लेझीम पथक स्पर्धेने प्रारंभ होत असून या महोत्सवामध्ये दि.22 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट रोजी पाककला, रांगोळी,मेहंदी, चित्रकला, भजन मंगळागौर समूहगीत,समूह नृत्य, बालनाट्य,साडी वेशभूषा यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन या महोत्सवात करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धा या छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे संपन्न होत असून सर्वांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आ.राजूमामा भोळे यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.