Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिरसोली रोडवर दुचाकी अपघातात तरूण जखमी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल
    क्राईम

    शिरसोली रोडवर दुचाकी अपघातात तरूण जखमी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 22, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । शिरसोली रोडवरून दुचाकीने घरी जात असलेल्या तरुणाला दुसर्‍या भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जनार्धन जमनादास आगे (वय-२९) रा. कुऱ्हे पानाचे ता. भुसावळ हे गुरुवार २० जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीटी ७९९३) वरून शिरसोलीकडून जळगावकडे येत असताना समोरून येणारी दुचाकी (एमएच १९ बीएस ९१४०) याने जोरदार धडक दिली. या धडकेत जनार्दन आगे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान धडक देणारा दुचाकी चालक हा दुचाकी घेऊन पसार झाला होता. शुक्रवारी २१ जानेवारी रोजी रात्री अज्ञात दुचाकीधारकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.