जळगाव : प्रतिनिधी
रक्षा बंधनासाठी गुजरात येथे बहिणीकडे गेलेल्या कुटुंबीयांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला. चोरलेला सुमारे ११ लाखांचा ऐवजसह चोरट्यांनी त्यांच्याच दुचाकीवरुन तेथून पळून जात होते. परंतु रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी त्या संयशास्पदरित्या दुचाकीवरुन जाणाऱ्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करीत एका चोरट्याच्या मुसक्या आवळल्या तर दुसरा मुद्देमाल घेवून पसार झाला. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास बजरंग बोगदा परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील महावीर नगरात नितीन खंदार हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. रक्षा बंधनानिमित्त ते कुटुंबियांसह गुजरात येथील वडोदरा येथे बहिणीकडे शुक्रवारी सकाळच्या सुमारास कारने गेले होते. यावेळी त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चार चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घराचा लोखंडी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घरातून ३ लाखांची रोकड आणि साडेआठ लाखांचे सोने चांदीचा ऐवज चोरुन नेला. पळून जाण्यासाठी चोरट्यांनी खंडार यांच्या मालकीच्या दोन दुचाकी घेवून ते पळून जात होते. याचवेळी महावीर नगरात राहणाऱ्या आरटीओ विभागातील अधिकाऱ्यांच्या घरावर टोळक्याने हल्ला करीत तोडफोड केली होती. दरम्यान, गस्तीवर असलेल्या शहर पोलीस ठाण्यातील पथक घटनास्थळावर माहिती घेत होते. याचवेळी पथकातील कर्मचारी ज्ञानेश्वर उन्हाळे यांना दोन दुचाकीवरुन चार संशयित इतर भरधाव वेगाने जातांना दिसले.
चोरटे संशयास्पदरित्या भरधा वेगाने जात असल्याचे दिसताच, शहर पोलीस ठाण्यातील गस्तीवर असलेले ज्ञानेश्वर उन्हाळे, नितीन केदारे व तुषार मिस्तरी या कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. पोलीस पाठलाग करीत असल्याचे समजताच चोरटे एसएमआयटी महाविद्यायाकडून वेगवेगळ्या दिशेने पळून जावू लागले. पथकाने बजरंग बोगद्याकडे जाणाऱ्या दुचाकीचा पाठलाग सुरु केला. याचवेळी चोरट्यांनी दुचाकीवरुन उडी घेवून ते बजरंग बोगद्याच्या दिशेने पळू लागले. यावेळी ज्ञानेश्वर उन्हाळे यांनी पाठलाग केला असता, चोरट्यांनी त्यांना शिवीगाळ करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली. मात्र तरी देखील उन्हाळे यांनी सिनेस्टाईल त्यांचा पाठलाग सुरुच ठेवला पळून जात असलेल्या चोरटे बजरंग बोगद्याजवळील रेल्वेची भिंत ओलांडण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी एका चोरट्याने भिंतीवर चढून तो चोरलेला मुद्देमाल घेवून तेथून पसार झाला. तर त्याच्या मागे असलेला चोरट्याला भिंत ओलांडता न आल्यामुळे ते पोलिसांच्या तावडीत सापडला. पोलिसांनी त्याच्यासह चोरलेली दुचाकी घेवून पोलीस ठाण्यात आणले