जळगाव : प्रातिनिधी
धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने आर्यकीर्ती उर्फ बबलू चंद्रकांत सोनवणे (२६, रा. श्यामनगर) हा तरुण ठार झाला. ही घटना शनिवारी (१७ ऑगस्ट) गिरणा पंपिंग रस्त्यानजीकच्या रेल्वे रुळावर घडली. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्यामनगरातील रहिवासी आर्यकीर्ती सोनवणे हा तरुण एका कापड दुकानात कामाला होता. शनिवारी (१७ ऑगस्ट) सकाळी ९ वाजेच्या सुमारास धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने तो ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविला. यावेळी नातेवाइकांनी आक्रोश केला. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे