यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील न्हावी येथे ३३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव प्रवीण सोमा साळुंखे असे आहे. नातेवाइकांनी त्यास तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रवीण साळुंखे यांनी शनिवारी राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार कुटुंब आणि नातेवाइकांचे निदर्शनास येताच त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी मृत घोषित केले. चंद्रकांत साळुंखे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहायक फौजदार देवीदास सूरदास करीत आहेत.