• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महाविकास आघाडीत खळबळ : हा नेता सोडणार साथ !

editor desk by editor desk
August 17, 2024
in राजकारण, राज्य
0
महाविकास आघाडीत खळबळ : हा नेता सोडणार साथ !

मुंबई : वृत्तसंस्था

महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा 16 ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडला. महाविकास आघाडीने यानिमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला पहिला धक्का बसण्याची शक्यता आहे. समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष माजी आमदार कपिल पाटील महाविकास आघाडीची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईत काल झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात कपिल पाटील हे उपस्थित नव्हते. मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि कपिल पाटील यांच्यात काहीसा दुरावा निर्माण झाला आहे. तो दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत कपिल पाटील यांच्या उमेदवारासमोर ठाकरे गटाने उमेदवार दिला होता. या निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराचा विजय झाला होता. तर कपिल पाटील यांनी उभ्या केलेल्या उमेदवाराचा पराभव झाला होता. तेव्हापासून कपिल पाटील महाविकास आघाडीवर पाटील नाराज असल्याचं बोललं जात होतं.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कपिल पाटील वेगळी भूमिका घेण्याची शक्यता आहे. कपिल पाटील यांनी आज राज्यभरातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. मुंबईत गोरेगावमध्ये हा मेळावा पार पडणार आहे. या कार्यक्रमात कपिल पाटील आपली भूमिका जाहीर करणार आहेत. कपिल पाटील हे गोरेगाव विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे कपिल पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Previous Post

देशभरातील डॉक्टरांनी पुकारला संप ; ओपीडी राहणार बंद !

Next Post

हे सरकार लेना बँक नाही ; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

Next Post
हे सरकार लेना बँक नाही ; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

हे सरकार लेना बँक नाही ; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group