आकोला वृत्तसंस्था । शेगाव येथील सराफा व्यापाऱ्यावर अनैसर्गिक लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडीत सराफ व्यापऱ्याने पोलीसांत तक्रार देण्यात आली.
अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक नितीन चव्हाण आणि शिपाई शक्ती कांबळे यांनी चोरीचे सोने खरेदी केल्याप्रकरणी शेगावमधील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकला रात्री ३ वाजता शेगावातून अटक केले होते. यावेळी शेगावातून अकोल्यात आणताना सराफा व्यापाऱ्याला गाडीतच प्रचंड मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. या दोन दिवसांत आरोपी सराफा व्यापाऱ्याला एपीआय चव्हाण आणि शिपाई कांबळे याने मारहाण केली. तसेच पोलीस कोठडीत आरोपीवर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. असा आरोप सराफ व्यापाऱ्याने केला आहे.
दरम्यान, व्यापाऱ्याची जामिनावर सुटका झाली. पोलिसांच्या तावडीतून बाहेर आल्यानंतर हादरलेल्या व्यापाऱ्याने आपल्या कुटुंबीयांना ही आपबिती सांगितली. व्यापाऱ्याच्या जळालेल्या पायावर अकोल्यातील एका खासगी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आरोपी व्यापाऱ्याने अकोला पोलीस अधिक्षक आणि सिटी कोतवाली पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.