Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अल्पवयीन मुलीची बदनामी करत आईला शिवीगाळ !
    क्राईम

    अल्पवयीन मुलीची बदनामी करत आईला शिवीगाळ !

    editor deskBy editor deskAugust 17, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील कांचन नगरातील एका भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे फोटो व्हाट्सअप स्टेटसला लावून बदनामी केली तसेच पीडित मुलीच्या आईला अश्लील शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता घडली होती. याप्रकरणी बुधवारी १४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांचन नगरातील एका भागात अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारास वास्तव्याला आहे. दरम्यान संशयित आरोपी अक्षय पंढरीनाथ सपकाळे (वय-२७), रा. बांभोरी ता. धरणगाव याने पीडित मुली सोबतचे असलेले फोटो व्हाट्सअपच्या स्टेटसला लावून समाजात बदनामी केली. तसेच पीडित मुलीच्या आईला फोन करून अश्लील शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता घडली. या संदर्भात पीडित मुलीच्या आईने बुधवारी १४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता शनिपेठ पोलिसांनी तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी अक्षय सपकाळे यांच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रंगनाथ धारवाड हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.