चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव तालुक्यातील वाकडी तालुक्यातील वाकडी शिवारात बकऱ्यांसाठी चारा घेण्यास गेलेल्या १२ वर्षाच्या मुलाचा तुटलेल्या वीज तारेला नकळत स्पर्श झाल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. तर या वेळी सुर्दैवाने तेथे असलेले बालकाचे वडिल बालबाल बचावले. दरम्यान, ही घटना घडली तेव्हा आ. मंगेश चव्हाण तेथेच होते. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अधिकाऱ्यांकडून पंचनामा करुन घेत बालकाचा मृतदेह रुग्णालयात नेला. तसेच पीडित कुटुंबीयांना धीर देत मदतीचे आश्वासन दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील वाकडीच्या शिवारातील शेतात बकऱ्यांसाठी चारा घेण्यास गेलेल्या १२ वर्षीय महेश अनिल सूर्यवंशी या चिमुकल्याचा शेतात तुटलेल्या वीज तारेचा नकळत स्पर्श झाल्याने जागेवरच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेत मुलाचे वडील ही थोडक्यात बचावले. बापाच्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याचा हृदय पिवळटून टाकणाऱ्या या घटनेची बातमी वाऱ्यासारखी गावात पोहोचली. या दुर्दैवी घटनेबद्दल सर्वत्र व्यक्त होत आहे. दरम्यान, योगायोगाने त्याचवेळी एका अंत्यविधीसाठी आमदार मंगेश चव्हाण हे वाकडी गावात आले होते. आमदार चव्हाण यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंबना करता तत्काळ घटनास्थळ गाठले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी उपस्थित वीज वितरण कंपनी व पोलीस प्रशासन यांना सूचित करून घटनेचा पंचनामा केला. या प्रसंगी आमदार मंगेश चव्हाण यांनी माणुसकीचे दर्शन दाखवत, भावनाविवश होत बालकाचा मृतदेह चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेला. या घटनेचा हृदय पिळवटून टाकणारे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वाकडी गाव हे आमदार चव्हाण यांच्या मामाचे गाव असल्याने त्यांचे या गावाशी जवळचे नाते आहे. आमदारांच्या माणुसकीचे दर्शन यानिमित्त पुन्हा एकदा झाले आहे.
मयताच्या कुटुंबियांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार – आमदार मंगेश चव्हाण
झालेली घटना अतिशय दुर्दैवी असून यात जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी दिल्या, महेश च्या दुर्दैवी मृत्यूने सूर्यवंशी कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे, जे नुकसान झोके नुकसान न भरून निघणारे आहे. मात्र वीज वितरण कंपनी व शासनाकडून तसेच वैयक्तिक पातळीवर जास्तीत जास्त मदत मयताच्या कुटुंबियांना मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी आमदार चव्हाण यांनी दिले.