जळगाव : प्रतिनिधी
कोलकत्ता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अतिप्रसंग करून तिची हत्या करण्यात आली मात्र अद्याप आरोपीचा शोध लागला नाही व त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. याचा निषेध म्हणून शनिवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रभर काळी रिबिन बांधून सर्व हॉस्पिटलमध्ये व क्लिनिक मध्ये सर्व डॉक्टर्स व सर्व स्टाफ यांनी निषेध नोदवावा आणि आय.एम.ए च्या भारत भरातील आंदोलनास सर्व डॉक्टर सेल तर्फे जाहीर पाठिंबा द्यावा असे सर्व डॉक्टर सेलच्या डॉक्टरांना जाहीर आव्हान करण्यात आले आहे की आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये व क्लिनिक मध्ये सर्व डॉक्टर्स व सर्व स्टाफने फक्त गंभिर रुग्णांना ऊपचार द्यावेत व आपले क्लिनीक बंद ठेऊन जाहीर निषेध नोंदवावा.
असे आवाहन प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सुनील जगताप यांच्या आदेशाने डॉ.नितीन वसंतराव पाटील अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादी विभागीय डॉक्टर सेल यांनी केले आहे .