जामनेर : प्रतिनिधी
शहरातील १८ वर्षीय तरुणाचे अपहरण करण्यात आल्याची घटना गुरुवारी घडली. दरम्यान, अपहरणकर्त्यांनी या तरुणाच्या पालकांकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी हा तरुणा व्यवसायासाठी खेड्यावर गेला होतो. दुपारी भावाच्या व्हाट्स अॅपपर या तरुणाचा अपघाताचा मेसेज आला.. पण तिथे नातेवाईक गेले असता त्याची दुचाकी आढळून आली. यानंतर रात्री आठ वाजता तरुण हरवल्याची तक्रार जामनेर पोलिसात नोंदविण्यात आली.. यानंतर त्याच्या भावाला पुन्हा मेसेज आला की, तुझा भाऊ आमच्या ताब्यात आहे. त्याला सोडवायचे असेल तर एक कोटी रुपये द्यावे लागतील. दरम्यान, मोबाईल लोकेशनमध्ये हा तरुणा अजमेर येथे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.