• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नातेवाईकाच्या अंत्ययात्रेहून घरी जातांना भीषण अपघात : पती -पत्नी जागीच ठार !

editor desk by editor desk
August 17, 2024
in क्राईम, चाळीसगाव, जळगाव, राज्य
0
नातेवाईकाच्या अंत्ययात्रेहून घरी जातांना भीषण अपघात : पती -पत्नी जागीच ठार !

एरंडोल : प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या भीषण घटना घडत असतांना नुकतेच नातेवाईकाच्या अंत्ययात्रेला हजेरी लावून दुचाकीने चाळीसगावकडे परतणारे पती-पत्नी ट्रकच्या धडकेत ठार झाले. ही भीषण घटना एरंडोलपासून सुमारे तीन कि.मी. अंतरावर न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलनजीक शुक्रवारी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास घडली. अविनाश विजयसिंग पाटील (५८) व मीनाबाई अविनाश पाटील (५२, रा. चाळीसगाव) असे ठार झालेल्या दाम्प्त्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथील यशवंत विद्यालयात शिक्षकेतर कर्मचारी म्हणून कार्यरत असेलेले अविनाश पाटील हे दुचाकी (क्र. एम.एच.१९ इड़ ४७१७) ने पत्नी मीनाबाई पाटील यांच्यासह पिंपळकोठा (ता. एरंडोल) येथे नातेवाईकाचे निधन झाल्याने अंत्ययात्रेला आले होते. अंत्ययात्रा आटोपल्यानंतर हे दाम्पत्य घराकडे परत जात असतांना न्यू इंग्लिश स्कूलपासून थोड्या अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने (क्र.एम.एच. १८ बीजी १०६६) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात मीनाबाई यांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. तर अविनाश पाटील हेदेखील जागीच ठार झाले. अपघात घडल्याचे पाहून शेतकरी व मजुरांनी घटनास्थळी धाव घेतली व एरंडोल पोलिस स्टेशनला त्याबाबत माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, हेकॉ. राजेश पाटील, संदीप पाटील, शिवाजी पाटील हे लागलीच अपघातस्थळी दाखल झाले. अविनाश पाटील यांचा मृतदेह एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान ट्रक चालकाला एरंडोल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Previous Post

या राशीतील लोकांनी करिअर किंवा व्यवसायात धोके घेऊ नका !

Next Post

१८ वर्षीय तरुणाचे अपहरण : कोट्यावधीच्या खंडणीची मागणी

Next Post
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

१८ वर्षीय तरुणाचे अपहरण : कोट्यावधीच्या खंडणीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group